वडवळ येथे माध्यमिक प्रशालेत दहावीच्या
विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ.....
अत्याधुनिक युगातील शैक्षणिक ज्ञान माध्यमिक प्रशालेत मिळाले.....
सोलापूर (कटूसत्य वृत्त):माध्यमिक प्रशाला वडवळच्या विद्यालयाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आमच्या बौद्धिक क्षमतेचा अंदाज घेत अत्याधुनिक युगातील शैक्षणिक ज्ञान अवगत करण्याची कला दिली.इयत्ता पाचवी मध्ये विद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. पाच वर्षाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षकांनी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे. जगाच्या पाठीवर आम्ही कोठेही शिक्षणासाठी गेलो तरी आम्ही तेथे कमी पडणार नाही. असा आत्मविश्वास आमच्या निर्माण करण्याचे काम वडवळ येथील माध्यमिक प्रशालाने केले असल्याचे मत इयत्ता दहावीची विद्यार्थिनी श्रुती मोरे यांनी व्यक्त केले.
माध्यमिक प्रशाला वडवळ येथे शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे बबन दादा शिंदे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका मोनिका सुर्वे होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष गायकवाड होते. त्यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता रोकडे यांनी केले. प्रसंगी मुख्याध्यापक गायकवाड म्हणाले की प्रशालेतील विद्यार्थीना कॉपी न करता प्रशालेतील परीक्षेचा सराव परीक्षा कडक वातावरणात घेतल्याने येणाऱ्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना फायदा होईल.
यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments