Hot Posts

6/recent/ticker-posts

सह्याद्री फार्मसीच्या एससीपीएम-क्रीडासप्ताह-२०२५ मध्ये झाल्या थरारक व अटीतटीच्या स्पर्धा

 सह्याद्री फार्मसीच्या एससीपीएम-क्रीडासप्ताह-२०२५ 

मध्ये झाल्या थरारक व अटीतटीच्या स्पर्धा

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे या कॉलेजमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा सप्ताहास एससीपीएम-क्रीडासप्ताह-२०२५ हे शीर्षक देण्यात आले. या क्रीडासप्ताहामध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, बॅडमिंटन, थ्रो-बॉल, बुद्धिबळ, कॅरम, रस्सीखेच, कब्बडी, गोळा फेक या स्पर्धा घेण्यात आल्या.एससीपीएम-क्रीडासप्ताह-२०२५ चे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ फोडून झाले. या एससीपीएम-क्रीडासप्ताह-२०२५  अंतर्गत डी.फार्मसी व बी.फार्मसी, एम.फार्मसी विद्यार्थ्यांनी क्रीडासप्ताह-२०२५ ची जोरदार तयारी केल्याने व विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादामुळे सर्व स्पर्धेत रंगत येऊन त्या अतिशय रोमांचकारक, अटीतटीच्या  झाल्या.या सर्व विजेत्या संघास व विद्यार्थ्यास ट्रॉफी,मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागप्रमुख प्रा.सौ.आर.के.कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व स्पर्धेचे सन्मानीय परीक्षक,तृतीय वर्ष बी.फार्मसी व द्वितीय वर्ष डी.फार्मसीचे विद्यार्थी तसेच इतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचे योगदान लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments