कौशिक गायकवाड यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
मोहोळ च्या मातीचा सुगंध हिमाचल प्रदेश मध्ये दरवळला
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून देशहितासाठी झटणाऱ्या व लोकसेवेसाठी समर्पित असणाऱ्या भारत देशातील प्रतिभावंत व गुणवंत व्यक्तींना हिमाचल प्रदेश चे विद्यमान महामहिम राज्यपाल शिव प्रताप जी शुक्ला यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले . कल्पकता आणि सामाजिक उद्यमशीलतेची गुणवत्ता या श्रेणीतील निवडक व्यक्तींना हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे रेडिशन ब्लू या पंचतारांकीत हॉटेल मध्ये यानिमित्ताने पुरस्कृत करण्यात आले . या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुका येथील सामाजिक व सहकार क्षेत्रामध्ये सातत्यपूर्ण क्रियाशीलता जोपासून लोकसेवा केल्याबद्दल मोहोळ निवासी कौशिक गायकवाड यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले .
सहकार व सामाजिक क्षेत्रामध्ये क्रांतीकारक दृष्टिकोन जोपासून अनेकांना रोजगार देणारे उच्चविद्याविभूषित कौशिक गायकवाड हे विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी आहेत . यंदाचे वर्ष हे भारत सरकारने 'सहकार वर्ष ' म्हणून घोषित केल्यानंतर देशातील सहकार क्षेत्राच्या असंख्य विद्यार्थी - अभ्यासक व्यक्ती व सहकारी संस्था यांना एकत्रित करून ' अखिल भारतीय सहकार संमेलना ' चे आयोजन करण्याची अभिनव संकल्पना रेखाटून तिला क्रियान्वित करणारी उपक्रमशीलता कौशिक गायकवाड यांनी जोपासली आहे . याशिवाय मोहोळ तालुक्याच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्रामध्ये संजीवन लोकसेवा करण्यासाठी कौशिक गायकवाड हे प्रतिबद्ध आहेत . त्यांच्यातील याचं अनन्यसाधारण राष्ट्रीय कर्तव्यभाव व गुणवत्तेचा गौरव म्हणून शिमला येथे महामहिम राज्यपाल यांच्या शुभहस्ते कौशिक गायकवाड यांना समारंभपूर्वक पुरस्कृत करण्यात आले . सहकार व सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून सांस्कृतिक महाराष्ट्राच्या मातीचा गंध देवभूमी हिमाचल प्रदेश येथे दरळविणाऱ्या कौशिक गायकवाड यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारादाखल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे .
0 Comments