Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरातील ७ मावळे करणार शिवजयंतीचे अवचित्त साधून १९ तास सलग राज्यशास्त्र दानपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम...

 सोलापुरातील ७ मावळे करणार शिवजयंतीचे 

अवचित्त साधून १९ तास सलग

राज्यशास्त्र दानपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम...

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी चार पुतळा समोर... सदर विश्वविक्रमास पहाटे ठीक ५ वाजता सुरुवात होणार असून हा विश्वविक्रम रात्री १२.३० वाजता पूर्ण होईल.. ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य व भारतीय लाठी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने या आगळ्यावेगळ्या ऐतिहासिक विश्वविक्रम आयोजित केला आहे.. दांडपट्टा या शिवकालीन ऐतिहासिक ज्वलंत इतिहास लाभलेल्या शस्त्रास महाराष्ट्र शासनाने राज्यशस्त्र म्हणून दर्जा दिला आहे.. नुसतं राज्यशस्त्र म्हणून नवे तर शालेय खेळामध्ये याचा समावेश व्हावा विद्यार्थ्यांना मर्दानी मैदानी खेळासह करिअरला सुद्धा चान्स मिळावा यासाठी सदर विश्वविक्रम करण्यात येणार आहे.... या विश्वविक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीचे औचित्य साधुन एक आगळावेगळा पद्धतीने मानवंदना सुद्धा देण्यात येणार आहे..... सदर विश्वविक्रमपूर्वी चार पुतळा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज.. यांना पुष्पहार अर्पण करून सदर विश्वविक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होणार आहे.....

सदर विश्वविक्रम ट्रॅडिशनल दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे ७ मावळे १) श्लोक कोळी.. २) आदिनाथ खंडेराव. ३) सुयश हूच्चे.४) अरमान पटेल ५) दर्शन राजोबा.६) प्रतोष आळंद...७) अश्विन कडलासकार (प्रशिक्षक स्वतः)..हे करणार आहेत यांना मुख्य प्रशिक्षक व ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवराम भोसले. व ट्रेडिशनल दाडपट्टा स्पोर्टस असोशियन चे उपाध्यक्ष सौ अंजना कडलासकर मार्गदर्शन प्रशिक्षण लाभले....
.
या विश्वविक्रमासाठी ऑक्टोबर २०२४ पासून या सात मावळ्यांचा सराव सुरू आहे.... सदर विश्वविक्रमाची नोंद द आयडल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड... व युनिकॉन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे.....

सदर विश्वविक्रमा चे उद्घाटन वेळ ठीक सकाळी ११ वाजता असणार आहे.... आमदार विजयकुमार देशमुख. आमदार देवेंद्र कोठे.. सरकारी वकील  प्रदीप सिंह रजपूत.. फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने.. तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार अॅड अविनाश कडलासकर डबल उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले पैलवान युवराज सरवदे. ह.भ. प. विनोद महाराज सरवदे यांच्या हस्ते होणार आहे..... या विश्वविक्रमासाठी दिवसभर विविध क्षेत्राचे मान्यवर भेट देऊन या मावळ्यांचा उत्साह वाढविणार आहेत.. तमाम सोलापूरकर कारणानी सुद्धा या मावळ्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी दिनांक १८ तारखेला उपस्थित रहावे असे ट्रॅडिशनल दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यातर्फे जाहीर आवाहन करण्यात आले आहे......
Reactions

Post a Comment

0 Comments