मिलिंद थोबडे , सरकारी वकील राजपूत यांच्या हस्ते शिवमूर्तीची पूजा
सोलापूर (कटूसत्यवृत्त):-शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शनिवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा ज्येष्ठ वकील मिलिंद थोबडे आणि सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते संपन्न झाली, यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, श्रीकांत डांगे, विनोद भोसले तात्यासाहेब वाघमोडे, गुंड साहेब, बजरंग जाधव, सचिन स्वामी, शिवराज विभूते, बसवराज कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती
0 Comments