संत तुकाराम महाराजांचे विचार आचरणात आणा : खटके
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-समाजाची प्रगती साधण्यासाठी संत तुकाराम महाराजांचे विचार आजच्या काळातही आवश्यक आहेत. त्यांनी रुढी, परंपरा व अंधश्रद्धा यांना गाडून विज्ञानाची कास धरण्याचा विचार दिला आहे. ते एक महान क्रांतिकारी, विज्ञानवादी, समतावादी संत होते. त्यांनी अभंगातून दिलेले विचार प्रत्येकाने रोजच्या आचरणात अंगिकाराले पाहिजेत, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके यांनी केले आहे.
तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालयात जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी खटके हे बोलत होते. सुरुवातीला संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी आबा झाडे, पांडुरंग घाडगे, धन्यकुमार गारुडी, किशोर कदम, नीलेश पाटील, अतुल निर्मळ, हेमंत शिंदे, आदिनाथ माने, अजित उपाध्ये, महेश कांडेकर, अविनाश घाडगे, पिंटू जाधव आदी उपस्थित होते.
0 Comments