Hot Posts

6/recent/ticker-posts

खाजगी प्राथमिक अस्थापनेवर लिपीकाची नेमणुक करा

 खाजगी प्राथमिक अस्थापनेवर लिपीकाची नेमणुक करा




खाजगी प्राथमिक शाळा कृती समितीची मागणी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिक्षण विभागातील खाजगी प्राथमिक शाळेच्या आस्थापनेवर कायम  लिपीकाची नेमणुक करा.अशा मागणीचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे दिल्याची माहीती डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
     डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,युवक शिक्षक कर्मचारी संघटना,महाराष्टृ राज्य शिक्षक सेना व अखिल भारतीय उर्दु संघटनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांची भेट घेतली.या शिष्टमंडळामध्ये आप्पाराव इटेकर,सुनिल चव्हाण,आप्पासाहेब पाटील,अ.गफुर अरब व संतोष साठे उपस्थित होते.शिक्षण विभागातील खाजगी प्राथमिक शाळेतील आस्थापनेवर मागील जवळपास  दिड वर्षापासुन प्रभारी लिपीकाची नेमणुक करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास ३०० खाजगी प्राथमिक शाळा असुन ३हजार शिक्षक कार्यरत आहेत.सेवकसंच दुरुस्ती प्रस्ताव,निवडश्रेणी प्रस्ताव,अतिरिक्त शिक्षका समायोजन प्रक्रीया राबविणे,अंशत: अनुदानित शाळेचा वाढीव टप्पा मंजुर करणे,मुख्याध्यापक पदाची मान्यता देणे,आरटीई मान्यता देणे यासारखी अनेक कामे या आस्थापनेवर असतात.कायम लिपीक नसल्यामुळे वरील कामे प्रलंबित राहतात. या कामासाठी जिल्ह्याभरातुन शिक्षकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.प्राथमिक शिक्षणाधिकारी सकारात्मक असुनही केवळ प्रभारी लिपीकामुळे कामे प्रलंबित आहेत.याचा मनस्ताप मुख्याध्यापक,शाळा व शिक्षकांना होत आहे.लिपीकपदी कायम कर्मचारी नेमुन जिल्ह्यातील शिक्षकांना दिलासा द्यावा.असे संघटनेच्या परिपत्रकात म्हंटले आहे.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
Reactions

Post a Comment

0 Comments