".. तर मातोश्री फोडून टाकू";
नामदेव शास्त्रींच्या समर्थकाने
उद्धव ठाकरे यांना शिवीगाळ करत दिली धमकी
मुबंई (कटूसत्य वृत्त):- विविध कारणांवरून राज्याचे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण होत असल्याचे आपण पाहत असतो. सध्या संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून राज्याचे राजकीय वर्तुळ चांगलेच ढवळून निघाले आहे.विरोधकांनी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशातच आज भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मुंडेंचे समर्थन केले. हे प्रकरण इथवरच थांबले नाही तर त्यांनी आरोपींना आधी मारहाण झाली, म्हणून त्यांची मानसिकता बिघडली असल्याचा दावा केला. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटले आहे.हा मुद्दा उचलून धरत विरोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकारांसह नामदेव शास्त्री, धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे आणि वाल्मिक कराड वर टीकेची झोड उठवली आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ पाटील यांना संभाजीनगर येथील दादा डुंगरे नावाच्या नामदेव शास्त्री, मुंडे आणि वाल्मिक कराडच्या समर्थकाने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवीगाळ करत मातोश्री फोडण्याची धमकी दिली आहे. अयोध्या पौळ पाटील यांनी याबाबतची ऑडिओ क्लिप आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केली आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. पौळ X वर लिहितात “आदरणीय बापमाणूस उद्धवजी साहेबांना अन् आमचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री ला मध्ये आणायचं नव्हतं. लोकांनी मला फोन करताना लक्षात ठेवावं की माझे आईबाबा, उद्धवजी साहेब अन मातोश्रीला मध्ये आणलं तर मग याचं भाषेत उत्तर मिळेल, मी उद्धवजी साहेबांसोबतच वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची देखील शिवसैनिक आहे हे लक्षात ठेवावं,” असे कॅप्शन देत अयोध्या पौळ पाटील यांनी ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.
0 Comments