Hot Posts

6/recent/ticker-posts

सैनिक यांच्या कुटुंबियांनी संरक्षण बाबत बैठकीस उपस्थित रहावे.

 सैनिक यांच्या कुटुंबियांनी संरक्षण बाबत बैठकीस उपस्थित रहावे. 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील सैनिक व माजी सैनिक यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली दि. 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे दालनात जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.   तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व सैनिक व माजी सैनिकांनी आपल्या अडीअडचणी विषयक संपूर्ण दस्तवेज दोन प्रती मध्ये सोबत घेऊन पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे दालनात सकाळी 11.30 वा. उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments