Hot Posts

6/recent/ticker-posts

राजकारणातील तो एक काळ........राजकारणातील हा एक काळ

 राजकारणातील तो एक काळ........राजकारणातील हा एक काळ

देशाच्या_राज्याच्या राजकारणात एक अशी वेळ होती जेव्हा सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्षातील नेत्यांकडून काही गोष्टींवरून आरोप-प्रत्यारोप व्हायचे तेव्हा पक्षश्रेष्ठी संबधित आरोपाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अथवा कित्येक नेत्यांवर आरोपानंतर राजकीय जीवनात उध्वस्त होण्याची वेळ आली तरी पक्षाला डाग लागू नये एवढ्या मुळे कित्येक नेत्यांचे बळी गेले परंतू पक्षश्रेष्ठींनी कधीच डोळेझाक केली नाही.

अगदी उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर अलीकडील काळात स्मृतिशेष विलासराव देशमुख  हे ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर सिनेदिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना घेऊन घटनास्थळी भेट दिली यावरून त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले.त्याच वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याकडून माध्यमांना प्रतिक्रीया देताना चुकून शब्द तोंडातून गेला तरी राजीनामा देत पक्षश्रेष्ठींचा आदेश अंतिम मानला.समकालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची संसदेवरील हल्ल्यानंतर कपडे बदल माध्यमातून टिपला गेला अन् त्यावरून त्यांनी राजीनामा दिला ते नंतर राजकीय वर्तुळातून बाहेर फेकले गेले.......हे सर्व मांडायचे कारण एकच गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात मस्साजोग गावचे लोकनियुक्त सरपंच स्मृतिशेष संतोष देशमुख यांची निर्घृण हत्याकांडानंतर वाल्मीक कराड अन् त्याचे सहकारी यांनी ती केली हे जगजाहीर झाले माध्यमातून प्रश्न विचारल्यावर धनंजय मुंडे यांनी जाहीर सांगीतले की हत्या कुठे होत नाहीत राज्यात सगळ्या जिल्ह्यात हत्या होतात  अगदी मग्रूर भाषेत प्रतिक्रिया देत हत्येचे समर्थन करताना आरोपींची खुलेआम पाठराखण करण्याचे काम केले.महाराष्ट्रातुन जिल्ह्याजिल्ह्यात मोर्च निघाले....आंदोलने झाली परंतू निर्दयी राज्यकर्ते अन् नैतिकता हरवलेले मुख्यमंत्री अशी ओळख असणारे देवेंद्र फडणवीस अन् टग्या म्हणून मिरवणारे अन् टग्याचे नेतृत्व करणारे अजित दादा पवार यांनी उलट दररोज एक नवीन हत्याकांडाबाबत खुलासा होत असताना अन् रोज नवा कारनामा लोकांसमोर_माध्यमासमोर येत असताना किमान संबंधित गुन्ह्य़ाचा तपास अन् धनंजय मुंडे यांच्यावर झालेले विविध आरोप यांच्या चौकशी संपेपर्यंत तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेणे अपेक्षित असताना आम्ही किती पाताळयंत्री आहोत हे समर्थन करत दाखवून दिले असून महाराष्ट्रात मात्र प्रचंड असंतोष अन् चीड निर्माण झाली असून.......अनैतिक सरकार अन् लबाडांचा कारभार एवढीच ओळख तयार झाली हे मात्र निश्चित......

सचिन जगताप

माढा_सोलापूर

Reactions

Post a Comment

0 Comments