दमानियांचा सर्वात मोठा बॉम्ब; मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाल्या 'आता राजीनामा द्यावाच लागेल!' - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 5, 2025

दमानियांचा सर्वात मोठा बॉम्ब; मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाल्या 'आता राजीनामा द्यावाच लागेल!'

 दमानियांचा सर्वात मोठा बॉम्ब; मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाल्या 'आता राजीनामा द्यावाच लागेल!'

मुबंई(कटूसत्य वृत्त):-सामाजिक कार्यकर्त्या अंजलीदमानियां यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. तसंच, मुंडे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना 161.68 कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप दमानियांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. दमानिया यांनी म्हटलं आहे की, 'एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे किती पैसे खातो याबाबत मी आज पुरावे देणार. DBT ही योजना सरकारने काढली होती. या योजनेचे पैसे लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी सरकारने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी एक GR काढण्यात आला होता. १२ एप्रिल २०१८ रोजीचा जीआर मुख्यमंत्र्यांना ही जी ६२ आयटम्सची लिस्ट आहे डीबीटी खाली येणार आहे. त्या ६२ आइटमला अॅड करण्याची मुभा ही मुख्यमंत्र्यांना आली आणि म्हणजे यातून काही आइटम वगळू शकत नाही पण मुख्यमंत्री त्यात अॅड करू शकतात. जर यातील काही आइटम वगळायचे असतील तर एक कमिटी बनविण्यात आली होती'१८४ लिटरची नॅनो युरियाची बॉटल ९२ रुपयांची आहे. पण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्यात तब्बल 220 रुपयांना ही बॉटल विकत घेतली गेली. कृषीमंत्री यांनी 19 लाख 68 हजार 408 बॉटल्स या 220 रुपयांनी घेतल्या. दुपट्टीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल्स विकत घेतल्या. चर 500 रुपयांच्या बॉटलचा बाजारभाव 269 रुपये पण 590 रुपयांना त्याची खरेदी केली आहे. या  गोष्टींचा एकूण घोटाळा कोटींचा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages