Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महापालिका प्रशासनाने पिचकाऱ्या मारणाऱ्या ६९ जणांवर केली दंडात्मक कारवाई

 सोलापूर महापालिका प्रशासनाने पिचकाऱ्या मारणाऱ्या 

६९ जणांवर केली दंडात्मक कारवाई 

                

                                                                                                                                              

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिका प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी मावा, गुटखा, पान खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्या ६९ जणांवर सोमवारी दंडात्मक कारवाई केली. ग्राहकांनी पिचकाऱ्या मारून घाण केलेला परिसर पान,  मावा विक्रेत्यांकडून स्वच्छ करवून घेतला. शहरातील पान, गुटखा आणि मावा विक्रेत्यांवरील कारवाईसाठी अनेक संघटना पाठपुरावा करीत होत्या. यावर अखेर कारवाई सुरू झाली आहे. विभागीय कार्यालय क्रमांक एकमधील आरोग्य निरीक्षकांनी सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पान टपऱ्यांवर थांबून कारवाईला सुरुवात

केली. दुकानाबाहेर पिचकाऱ्या मारणाऱ्यांना १० हून अधिक जणांना १०० रुपयांप्रमाणे दंड केला. रस्ते, फुटपाथ, झाडाचा रंग बदलला शहरात एका पान विक्रेत्याची दुकानांची चेन आहे. रेल्वे स्टेशन, रामलाल चौक येथील या दुकानांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर घाण पाहायला मिळते. या दुकानाच्या आजूबाजूला दवाखाने, कपड्यांची दुकाने, मेडिकल आहेत. येथे येणाऱ्या ग्राहकांना पानवाले, पिचकाऱ्या मारणाऱ्या ग्राहकांचा त्रास सहन करावा लागतो. या ग्राहकांनी पिचकाऱ्या मारून रस्ते, फूटपाथ, झाडांचे बुंधे घाण करून ठेवले आहेत. या दुकानातील कामगारांना सोमवारी ही घाण साफ करायला लावली.

Reactions

Post a Comment

0 Comments