जनसुरक्षा कायदा रद्द करा, मोहोळ तालुका काँग्रेसचे धरणे आंदोलन
मोहोळ(कटूसत्य वृत्त):-राज्य शासनाने जनसुरक्षा विधेयक 2024 हा कायदा अंमलात आणण्यासाठी हालचाली सुरु केलेल्या आहेत.जनसुरक्षा कायदा हा शहरी नक्षलवाद नष्ट करण्यासाठी आणला गेला असल्याचे सरकार सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे.या कायद्या अंतर्गत समाज हितासाठी आंदोलन करणारे ,सामाजिक कार्यकर्ते ,लेखक ,पत्रकार ,शेतकरी यांना या संंशयावरुन या कायद्याचा दुरुपयोग होवु शकतो.मानवाधिकाराचे उलंघन होवु शकते.त्यामुळे जनतेचा मुलभुत हक्काचा गळा घोटणारा ,आंदोलनाचा अधिकार हिरावुन घेणारा ,जनविरोधी ,घटनाविरोधी ,लोकशाहीचा गळा घोटणारा जनविरोधी कायदा तातडीने मागे घ्यावा म्हणुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामती येथे धरणे आंदोलना नंतर कामती पोलिस स्टेशन येथे निवेदन एपीआय उदार साहेब यांना देण्यात आले .यावेळी मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी ,जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार यांचे प्रमुख उपस्थितीत जेष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील यांचे हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी विजय पवार ,अजित जगताप, ज्ञानेश्वर पाटील, सिताराम पुजारी उपस्थित होते.
0 Comments