तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत जयहिंद विद्यालयाचा दबदबा कायम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 10, 2025

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत जयहिंद विद्यालयाचा दबदबा कायम

 तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत जयहिंद विद्यालयाचा दबदबा कायम 




कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जयहिंद विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी आपली परंपरा कायम ठेवत दि. 8 व 9 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी विद्यालय, चिखली येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये कसबे तडवळे येथील जयहिंद विद्यालयाने आपला दबदबा कायम राखत 17 वर्षे वयोगटाखालील मुलांच्या संघाने अव्वल स्थान पटकावले. त्यांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. या वयोगटात 30 संघ सहभागी झाले होते.तसेच 14 वर्षे वयोगटाखालील संघाने सहभागी 31 संघांमध्ये द्वितीय क्रमांक तर 19 वर्षे वयोगटाखालील संघाने 10 संघांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.सर्व यशस्वी खेळाडूंना ठाकरे पी. के., पठाण आय. एल. यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी.टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार सर, शा. व्य. समितीचे चेअरमन टी. पी. शिनगारे, उपाध्यक्ष हनुमंत पवार, मुख्याध्यापक  एस. एस. पाटील,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक यांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages