आगामी उत्सवांतही डीजेबंदीसाठी वर्षभर प्रबोधन करणार : अॅड. माने
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- डोजे (डॉल्बी) मुक्त व लेझर लाइटशिवाय झालेला यंदाचा सोलापुरातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक संस्मरणीय ठरली. उत्सव मंडळ आणि सोलापूरकर नागरिकांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाचा चांगला संदेश राज्यभरात गेला. आगामी काळात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवात तसेच राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीची मिरवणूकही डीजेमुक्त वातावरणात काढण्यात यावी यासाठी वर्षभर प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती डीजेमुक्त सोलापूर कृती समितीचे अध्यक्ष अॅड. धनंजय माने यांनी दिली.
शहरात नुकताच गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साही वातावरणात साजरा झाला. दहा दिवसांच्या मुक्कामी आलेल्या श्री गणरायाच्या स्वागताच्या दिवशी आणि विसर्जन मिरवणुकीतही
कोणत्याही मंडळांनी डीजे लावला नाही. लेझर लाइटलाही फाटा दिला, गणेश विसर्जन सोहळा
एकाही डीजे साऊंड सिस्टिम वाले लाइटशिवाय पार पडला. राज्यातील हा पहिलाच १०० टक्के डीजेमुक्त गणेशोत्सव ठरला. हलम्या, लेझीम, ढोल ताशांच्या गजरात श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
कर्णकर्कश डीजेचा लहान मुले, महिला, वयोवृध्द, रुग्ण, बंदोबस्तासाठी असणारे पोलीस या सर्वांना त्रास होत असल्याने डीजेबंदीसाठी शहरात उठाव झाला. डीजेबंदीसाठी गठीत केलेल्या कृती समितीचे अध्यक्ष अँड. धनंजय माने यांनी यासाठी पुढाकार घेतला.
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थी, कर्मचारी यांनी रॅली काढून पोलीस आयुक्तांना
निवेदन दिले. शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून डीजेबंदीला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला द्वीपचंदीचा आदेश काढावा लागला होता. ध्वनिप्रदूषणावात
व्यापक जनजागृती झाल्याने मिरवणूक डीजेमुक्त वातावरणात पार पडली. डीजेचा दणदणाट नसल्याने आबालवृध्द मिरवणूक पाहण्यासाठी मोठया संख्येने घराबाहेर पडले होते.
सोलापूरबदल आजपर्यंत सर्वत्र नकारात्मक वातावरण निर्माण केले गेले. परंतु, या मिरवणुकीत
डीजे बंद केल्याचा मोठा संदेश राज्यातच नव्हे तर देशात गेला. त्याचे अनेक ठिकाणांहून स्वागत झाले. सोलापूरचा हा पैटर्न अन्य शहरातही राबविला जाणार आहे. सोलापूरला आता आयटी पार्क होणार असल्याने डीजेवरील ही बंदी आगामी सण, उत्सव आणि अन्य मिरवणुकांतही कायम राहावी, यासाठी कृती समितीमार्फत मंडळांचे पदाधिकारी व कार्यकत्यांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे अॅड. माने यांनी सांगितले. कृती समितीच्या आवाहनाला लोकांचा मोठा पाठिबा मिळाला, असेही ते म्हणाले.
0 Comments