पालिकेकडून नागरिकांना मिळणार १४५ सेवांचा ऑनलाइन लाभ
सोलापूर,(कटुसत्य वृत्त):- महापालिकेतून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या १४५ सेवांचा लाभ आता
ऑनलाइन पद्धतीने घेता येणार आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर या सर्व सेवांची माहिती देण्यात आली असून, नागरिकांना घरबसल्या किंवा कार्यालयात न जाता सोयीस्कर पध्दतीने आवश्यक अर्ज सादर करण्याची व सेवा मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत पारदर्शक व जलद सेवा नागरिकांना
उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटलायझेशनवर विशेष भर देण्यात आला आहे. याअंतर्गत वा सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या १४५ सेवा ऑनलाइन उपलब्ध असल्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ खर्च व श्रम वाचणार आहे.
८ सप्टेंबरपासून नागरिकांना उपलब्ध असलेल्या २४५ सेवांचा लाभ केवळ ऑनलाइन पध्दतीने घेता येईल, या सर्व सेवांचा अर्ज करताना अर्जदारांनी स्वतःचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक यासह अचूक माहिती प्रणालीमध्ये भरावी. सादर केलेल्या अर्जातील त्रुटी, माहिती अपूर्ण राहिल्यास सेवा मिळण्यात विलंब होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. संबंधित विभागाने प्राप्त झालेल्या ऑनलाइन अजांची नोंद घेऊन वेळेवर कार्यवाही करणे बंधनकारक आहे. यामुळे सेवांच्या वितरणात पारदर्शकता, गती व जबाबदारी निश्चित होणार आहे. सर्व विभाग प्रमुख क्षेत्रीय अधिकारी व संबंधित अधिकारी यांनी या सेवांच्या व वेळेत पूर्ततेसाठी दक्षता घ्यावी, असे आदेश आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी दिले आहेत.
0 Comments