Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शी बाजार समितीचे १९० मतदार अपात्र

                                  बार्शी बाजार समितीचे १९० मतदार अपात्र

जिल्हा उपनिबंधक : पाच हजार ८५ मतदार पात्र
सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- बार्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची अंतिम मतदार यादी निश्चित झाली आहे. पाच हजार ८५ मतदार पात्र तर १९० मतदार अपात्र झाले आहेत. अपात्र मतदारांमध्ये व्यापारी वर्गात १७३, हमाल - तोलार मधील १७ असे एकूण १९० मतदारांचा समावेश आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप यादी जाहीर केली होती. त्या यादीवर ७८ जणांनी एक  हजारांपेक्षा जास्त हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुनावणी घेऊन मतदारांना अपात्र करुन अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी व्यापारी वर्गातून एक हजार ३७८, हमाल
तोलार मधून एक हजार २५, सहकारी संस्थेतून एक हजार ६४३ तर ग्रामपंचायत मतदार यादीतून एक हजार ३९ मतदार पात्र झाले असून, त्यानाच बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. दरम्यान, बार्शी बाजार समितीची निवडणूक सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून हालचाली सुरू
झाल्या आहेत.
चौकट 
अंतिम निश्चित मतदार यादी 
व्यापारी मतदारसंघ-१३७८ 
सहकारी संस्था- १६४३ 
हमाल-तोलार - १०२५
ग्रामपंचायत- १०३९ 
एकूण- ५०८५
Reactions

Post a Comment

0 Comments