मोहोळ नगरपरिषदेच्या सहा प्रभागांसाठी २१ हरकती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 10, 2025

मोहोळ नगरपरिषदेच्या सहा प्रभागांसाठी २१ हरकती

                                 मोहोळ नगरपरिषदेच्या सहा प्रभागांसाठी २१ हरकती



पोखरापूर : (कटुसत्य वृत्त):- मोहोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रारूप प्रभाग रचनेला २१ हरकती दाखल झाल्या होत्या. त्या हरकतीवर निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणी झाली. मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक १ ते ५ व ८ साठी हरकती घेण्यात आल्या होत्या.
१८ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्दकरण करण्यात आले. त्या प्रारूप प्रभाग रचनेवर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार मोहोळ नगरपरिषदेच्या नव्याने झालेल्या प्रभाग १ ते ५ व ८ साठी २१ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्या (मोहोळ नगरपरिषद, मोहोळ, मोहोळ नगरपरिषद मोहोळ.
हरकत्यांची सुनावणी ३ सप्टेंबर रोजी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी गणेश निहाळी
यांच्या दालनात सुनावणी झाली. यावेळी मोहोळ नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी डॉ.
योगेश डोके उपस्थित होते. त्यावेळी २१ हरकतदारांपैकी १४ जण उपस्थित होते तर ७ जण गैरहजर होते.
भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, भारत नाईक, अतुल क्षीरसागर, सुहास आखाडे, सुरज गायकवाड, धीरज गायकवाड, निलेश लोंढे आदींनी घेतलेल्या हरकतीबाबत
उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. इन कॅमेरा झालेल्या सुनावणीनंतर दि. २६ ते ३० सप्टेंबरच्या दरम्यान नगरपरिषदांची व नगरपंचायतीची प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. आता अंतिम प्रभाग रचनेकडे इच्छुक उमेदवारांचे व मतदारांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages