Hot Posts

6/recent/ticker-posts

आयुक्तांचा स्वच्छता आढावा, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

 आयुक्तांचा स्वच्छता आढावा, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- “माझं सोलापूर – स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर” या मोहिमेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, सह. आयुक्त शशिकांत भोसले, सह. आयुक्त मनीषा मगर,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, विभागीय अधिकारी उपस्थिती होते.
कोनापुरे चाळ, मोदी, लष्कर,नळ बाजार, लोधी गल्ली ,सिद्धार्थ चौक,पाथरूड चौक,अशोक चौक, बापूजी नगर अशा परिसरांना भेट देऊन त्यांनी घरोघरी घंटागाडी जाते का, कचरा संकलन नियमित होते का याची पाहणी केली.तसेच अरुंद बोळामध्ये गाडी जात असल्यास त्या ठिकाणी कचरा मक्तेदाराने  कर्मचारी नियुक्ती करून कचरा संकलन करावे असे आदेश दिले आहेत. यावेळी फुटपाथवर वाढलेले गवत व काही ठिकाणीरस्ता दुभाजक मधील अनावश्यक वाढलेले गवत व कचरा काढून घेण्याबाबत सुचना दिले .
या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच ज्या ठिकाणी घंटागाडी असूनही कचरा टाकला जातो, तेथे संबंधित आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले.
नागरिकांना आवाहन महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की : कचरा रस्त्यावर किंवा फुटपाथवर टाकू नये. घरगुती कचरा फक्त घंटागाडीमध्येच द्यावा.
दुबाजक व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवावीत.
“आपलं शहर – आपली जबाबदारी, स्वच्छ सोलापूर – सुंदर सोलापूर” हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा, असे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आवाहन केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments