साेलापुरातील दोन उड्डाणपुलांंसाठी हवी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील संभाव्य दोन उड्डाण पुलांसाठी केंद्र सरकारच्या मालकीच्या काही जागांचे संपादन करावे लागणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा गरजेचा असल्याचेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
उड्डाणपुलांसाठी एप्रिल महिन्यात 966.24 कोटींच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 'एक्स'वरून दिली आहे. केंद्रीय समितीमध्ये सोलापूरच्या या सुधारित प्रस्तावास अंतिम मान्यता मिळाली. मे अखेर भूसंपादनाचे काम पूर्ण करून नवीन निविदा काढली जाणार होती. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीअभावी हा विषय रखडल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
0 Comments