सोलापुरात वीरशैव कक्कय्या महिला प्रतिष्ठान तर्फे गरबा-दांडिया स्पर्धा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 17, 2025

सोलापुरात वीरशैव कक्कय्या महिला प्रतिष्ठान तर्फे गरबा-दांडिया स्पर्धा

 सोलापुरात वीरशैव कक्कय्या महिला प्रतिष्ठान तर्फे गरबा-दांडिया स्पर्धा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वीरशैव कक्कय्या महिला प्रतिष्ठान व कार्यकारिणी मंडळ, सोलापूर यांच्या वतीने महिलांसाठी गरबा व दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे होणार आहे.

स्पर्धेसाठी सहभागी महिलांनी घागरा-चोली हा ड्रेस कोड अनिवार्य पाळावा लागणार आहे. पाच दिवसांच्या प्रॅक्टिसला उपस्थित असलेल्या सदस्यांनाच स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील क्रमांक बाहेरील परीक्षकांमार्फत निश्चित केले जाणार आहेत.

मेकअपसाठी सभागृहात ब्युटिशियनची सोय करण्यात आली असून त्याचा खर्च स्पर्धकांना स्वतः करावा लागणार आहे. मेकअप करवून घेणाऱ्या महिलांनी दुपारी १२ वाजता हजर राहावे, तर घरी मेकअप करून येणाऱ्यांनी दुपारी १.३० वाजेपर्यंत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. दुपारी २.१५ वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

सहभागी महिलांनी पाण्याची बाटली सोबत आणावी तसेच जेवण करून यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुखापतीसाठी संस्थेची जबाबदारी राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्पर्धेत फक्त ड्रेस कोड पाळणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार असून इतरांना जनरल राऊंडमध्ये भाग घेण्याची संधी असेल. पालक व मैत्रिणींना मोफत प्रवेश देण्यात आला आहे.

संस्थापिका अध्यक्षा सौ. संगीता गंगाधर जोगधनकर (राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष) यांनी सर्व महिलांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages