हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर येथे अभियंता दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर येथे अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास बालाजी सरोवर मधिल अभियंते बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व सह व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर रेड्डी ' तसेच हॉटेल चे मॅनेजर जोशी व सर्व स्टाफ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून झाली. यानंतर अभियंता दिनाचे महत्व अधोरेखित करत अभियंते समाजाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावत असल्याचे राजेश्वर रेडडी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. हॉटेल व्यवसायात जे महत्वाचे काम आहे ते मेन्टेन्टन्स टिम मधिल सर्व अभियंते यांचे आहे . ते २४ तास हॉटेल मधिल कामाचे नियोजन करतात. या मुळे यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आधुनिक तंत्रज्ञानातील बदल, उद्योग क्षेत्रातील संधी व भावी पिढीसाठी उपलब्ध होत असलेल्या सुविधा यावरही राम रेड्डी विचार व्यक्त्त केले
कार्यक्रमात उपस्थित बालाजी सरोवर मधिल अभियंत्यांचा सत्कार राम रेडडी व राजेश्वर रेड्डी यांच्या हस्तेकरण्यात आला. या वेळी अभियंते बांधकाम, उद्योग, तंत्रज्ञान व समाजासाठी आपले योगदान सतत देत असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअरच्या वतीने सर्व अभियंत्यांनी नविन प्रयोग करून विविध नाविन्यपुर्ण उपकमा चे प्रदर्शन केले त्या मध्ये भाग घेतलेल्या अभियंत्याचा सत्कार या कार्यक्रमा मध्ये करण्यात आला. शिस्तबद्ध व आकर्षक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
विवेक जोशी, महांतेश तोलानुरे, निलगंगा शिंदे अनिल विपत, पवन ताटी . विनोद चुंगे . दत्तप्रसाद सांजेकर ' अंबुज कुमार, महेश जाधव, अमनदीप झा, गीता हसनी, आदित्य मडिवल, अजित कुमार, नितीन गायकवाड, दिवाकर गोसावी, अंजनी वर्मा. सचिन मोरे ' बसवराज अंटद उपस्थित होते.
0 Comments