भाजपाचे मोहोळ शहर व उत्तर ग्रामीण मंडळाच्या सरचिटणीस पदी अरविंद माने यांची नियुक्ती

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पार्टीच्या (भा.जा.पा.) मोहोळ शहर व उत्तर ग्रामीण मंडळाच्या सरचिटणीस पदी अरविंद मच्छिंद्र माने यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीपत्राचा वितरण समारंभ भाजपाच्या जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात पार पडला.
अरविंद माने हे भाजपाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा संघाशी जवळचा संबंध आहे. त्यांनी भाजपाचे मोहोळ शहराध्यक्ष आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणूनही कार्य केले आहे. याआधी, माजी खासदार शरदजी बनसोडे यांच्या निवडणुकीत त्यांनी विधानसभा प्रमुख म्हणूनही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
अरविंद माने यांच्या नियुक्तीपत्र प्रदान करतांना जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्यासोबत मोहोळ मंडलाध्यक्ष सतीश आप्पा काळे, मोहोळ दक्षिणचे मंडलाध्यक्ष रमेश माने, अनुसूचित मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव दादा खिलारे, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुशील क्षीरसागर, माजी संघटन सरचिटणीस महेश सोवनी, माजी जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांसह भाजपाचे इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments