मांडवे येथे एका इसमाकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त
नातेपुते पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल
अकलूज (कटूसत्य वृत्त):-खंडाळी तालुका माळशिरस येथील व्यक्ती अनिकेत महादेव पडसळकर याच्या कडून, मांडवे तालुका माळशिरस येथे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले असून, तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतःजवळ, अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ कारवाई केली.
दिनांक 20/09/2025 रोजी पहाटे 03.25 वाजता मौजे मांडवे, ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. तपासणीदरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. या प्रकरणात नातेपुते पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके व स.पो.नि. संदीप गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील एएसआय श्रीकांत निकम, पोलीस नाईक राकेश लोहार, व पोलीस नाईक दत्ता खरात यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments