Hot Posts

6/recent/ticker-posts

बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्यावतीने यंदा नरसिंह अवतार हा देखावा

 बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा  मंडळाच्यावतीने 

यंदा नरसिंह अवतार हा देखावा 

सोमवारपासून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्यावतीने २२ ते ३० सप्टेंबर दरम्यान विविध समाजउपयोगी उपक्रम घेण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी नरसिंह अवतार हा देखावा मंडळाच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. या देखाव्याचे उद्घाटन २४ सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती यांनी उद्योजक संकेत थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 २२ रोजी घटस्थापना दिवशी श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून सकाळी नऊ वाजता वाजत गाजत  मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. २३ रोजी सायंकाळी आठ वाजता मल्लिकार्जुन मंदिरात राजस्थानी सत्संग परिवार विठ्ठल दायमा हे सुंदर कांड कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत. २५ रोजी ओरिएंट इलाईट येथील रिद्धी सिद्धी हॉल मध्ये स्त्री रोग तज्ञ व प्रसूती तज्ञ डॉ. नेहा गायकवाड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.  26 रोजी सायंकाळी सात वाजता लिंबू चमचा व संगीत खुर्ची स्पर्धा होणार आहे. २७ रोजी सायंकाळी सहा वाजता जोडप्यांसाठी एक नंबर जोडी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली आहे . २८ रोजी संध्याकाळी सात वाजता सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते श्री देवीची महापूजा करण्यात येणार आहे. २९ रोजी मल्लिकार्जुन मंदिरात सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत रक्तदान शिबिर व सोलापुरातील सुप्रसिद्ध रक्ताच्या सर्व विकारातील तज्ञ डॉ. संतोष खुबा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता महिलांच्या उपस्थितीत गंगाआरती होणार असून त्यानंतर रात्री आठ वाजता इरकल साडीच्या वेशभूषेत महिलांच्या हस्ते भव्य महाआरती होणार आहे.

         या पत्रकार परिषदेस अजित धूम्मा, सागर हिरेहब्बू, निखिल थोबडे, उत्सव अध्यक्ष शुभम उळागड्डे, जयराज अमनगी, आदित्य धुम्मा, शिवराज धप्पाधुळे, शुभम तुकमाळी, अभिषेक कुंभार आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments