Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरची श्री कुलस्वामिनी रुपाभवानी मंदिरात सोमवारी घटस्थापना शारदीय नवरात्रोत्सवास होणार प्रारंभ

 सोलापूरची श्री कुलस्वामिनी रुपाभवानी  मंदिरात 

सोमवारी घटस्थापना शारदीय नवरात्रोत्सवास होणार प्रारंभ

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व मुख्य पुजारी मल्लिनाथ मसरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 

यात्रा कालावधीत दररोज सकाळी महापूजा व रात्री नित्योपचार पूजा करून देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना काढण्यात येणार आहे. २२ सप्टेंबर रोजी पहाटे प्रक्षाळ पूजा करून सकाळी नऊ वाजता महापूजा करण्यात येणार असून सकाळी ११ वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यांनतर रात्री नित्योपचार पूजा व छबिना काढण्यात येणार आहे. २३ रोजी श्री देवीची सकाळी १० वाजता महापूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा व छबिना निघणार आहे. २४ रोजी श्री देवीची सकाळी १० वाजता महापूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री नित्योपचार  पूजा व छबिना निघणार आहे. २५ रोजी सकाळी महापूजा व रात्री श्री देवीची नित्योपचार पूजा व छबिना काढण्यात येणार आहे. २६ रोजी सकाळी महापूजा होणार असून ललित पंचमीनिमित्त सायंकाळी ५ वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नित्योपचार पूजा व छबिना काढण्यात येणार आहे. ३० रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून दुपारी 1 वाजता होमविधीस प्रारंभ होईल. सायंकाळी सात वाजता पूर्णाहुती होत आहे. त्यानंतर मसरे यांच्या घरातून सायंकाळी सात वाजता दहीहंडीची मिरवणूक निघणार आहे. दहीहंडीचा दुग्धअभिषेक रात्री आठ वाजता होऊन रात्री देवीची महापूजा करून छबिना काढण्यात येणार आहे. १ ऑक्टोंबर रोजी महानवमीनिमित्त सकाळी अलंकार पूजा व रात्री नित्योपचार पूजा व छबिना निघणार आहे. २ ऑक्टोंबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन संध्याकाळी पाच वाजता श्री रुपाभवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी मंदिरापासून वाजत-गाजत निघणार आहे. यावेळी पार्क मैदानावरील शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. या ठिकाणी सीमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे येईल. ६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त श्री देवीची सकाळी अलंकार महापूजा करून भक्तांना महाप्रसाद वाटण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा व छबिना मिरवणूक काढून सर्वांना दुधाचा प्रसाद देऊन नवरात्रौत्सवाची सांगता करण्यात येणार असल्याचे मसरे यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेस सिध्देश्वर बँकेचे अध्यक्ष माजी प्रकाश वाले, सुधीर थोबडे, सुनील मसरे, सोमनाथ मेंगाणे, अनिल मसरे, बाळासाहेब मुस्तारे, प् संजय दर्गोपाटील, दया सालूटगी, शिवशंकर कुर्डे, बिपिन धुम्मा, अमर चव्हाण, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते.

आदीशक्तीचा जागर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप असलेल्या श्री रूपाभवानी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवात हजारो महिला भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. नवरात्र काळात आदी शक्तीचा जागर केला जातो. आमच्या पूर्वजांपासून आजपर्यंत ही परंपरा चालत आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी  

मल्लिनाथ मसरे

Reactions

Post a Comment

0 Comments