Hot Posts

6/recent/ticker-posts

निरोगी जीवनशैली, नियमित तपासणी व उपचाराने कॅन्सर 100% बरा होतो- डॉ. शिरीष कुमठेकर

 निरोगी जीवनशैली, नियमित तपासणी व उपचाराने कॅन्सर 100% बरा होतो- डॉ. शिरीष कुमठेकर



जागतिक कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती व मार्गदर्शन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निरोगी जीवनशैली, नियमित तपासणी व उपचाराने कॅन्सर आजार 100% बरा होतो. असे मत डॉ. शिरीष कुमठेकर यांनी जागतिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटना आणि जेनस्को यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर सांस्कृतिक भवन येथे आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.

या मार्गदर्शन कार्यक्रमाची सुरुवात पंकजा पंडित यांनी णमोकार महामंत्र्याने केली. डॉ. शिरीष कुमठेकर पुढे म्हणाले की, "कॅन्सर हा आजार पहिल्या, दुसऱ्या, स्थितीमध्ये शंभर टक्के बरा होतो. त्यासाठी आपण न घाबरता कॅन्सरची तपासणी करावी. तिसऱ्या, चौथ्या, स्थितीमध्ये आजार माहीत झाला तर बरा होण्यासाठी वेळ लागतो आणि 60% रुग्ण  बरे होण्याची शक्यता असते" यावेळी डॉ. विपुल दोशी म्हणाले की, आधुनिक उपचार, नवीन औषधे, स्क्रीनिंग टेस्टमुळे कॅन्सर बरा होतो. तसेच डॉ. योगेश बंग यांनी केमोथेरेपीचे महत्त्व सांगितले. डॉ. सरिता कोठाडिया  यांनी स्त्रियांना स्तनाचे व गर्भाशयाचे कॅन्सर होण्याची शक्यता असते, त्यासाठी नियमित तपासणी करुन, त्यावर उपचार केल्यास आजार बरा होतो, असे मत व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हाध्यक्ष  देशभूषण व्हसाळे  यांनी केले. राज्याध्यक्ष केतनभाई शहा यांनी आपल्या प्रास्ताविकेत भारतीय जैन संघटना व जैनस्कोने केलेल्या समाजोपयोगी आणि लोकोपयोगी कार्याची माहिती दिली. कर्करोग जनजागृतीचे महत्त्व सांगितले. यावेळी डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी महिलांना 4 फेब्रुवारीला दुपारी बारा ते तीन या वेळेत दमाणी रक्तपेढी डफरिन चौक येथे तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास श्याम पाटील, अभिनंदन विभुते, माया पाटील विक्रांत बशेट्टी, महावीर नळे, अजितकुमार शहा- भूमकर, नंदकुमार कंगळे, प्रशांत वायकसकर, रेवती शहा- भूमकर, विमलनाथ गुमते सह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यसचिवा संतोष बंब यांनी केले तर जैनस्कोचे कोषाध्यक्ष अरुणकुमार धुमाळ यांनी आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments