Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते शहराचा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याच्या ठरावास मंजुरी : अतुल पाटील

नातेपुते शहराचा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याच्या ठरावास मंजुरी : अतुल पाटील



नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
नातेपुते विकास आराखड्याबाबत अनेक त्रुटी आढळल्या. अस्तित्वात नसणारे रस्ते नकाशात दाखवण्यात आले. मूळ नकाशा प्रमाणे गट नंबर न दाखवता दुसऱ्या ठिकाणी दाखवण्यात आले. रहिवासी घरी पाहून रस्ते आरक्षित करायला पाहिजे होते मात्र तसे झाले नाही त्यामुळे नातेपुते शहराचा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याबाबत लोकप्रतिनिधीकडून ठरावास मंजुरी घेण्यात आली असल्याचे नातेपुते नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सांगितले.
                                ते नातेपुते नगरपंचायत येथे नातेपुते शहराच्या विकास आराखड्याबाबत घेण्यात आलेल्या विशेष सभेत बोलत होते.
सभेसाठी नगराध्यक्षा अनिता  लांडगे, उपनगराध्यक्ष  अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मालोजीराजे देशमुख,  सुरेंद्र सोरटे, संगीता काळे, आण्णा पांढरे, रणजीत पाढरे, स्वाती बावकर,  उत्कर्षाराणी पलंगे, दीपिका देशमुख,  अविनाश दोशी, भानुदास राऊत, दीपक काळे, सविता बरडकर, शर्मिला चांगण, माया उराडे व मुख्याधिकारी  माधव खांडेकर उपस्थित होते. नातेपुते विकास आराखड्या बाबत नातेपुते शहरातील नागरिकांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या होत्या. परंतु हा विकास आराखडा नगर रचना कार्यालय सोलापूर यांनी सर्वे तयार केला होता. परंतु विकास आराखड्याबाबत केलेला सर्वे हा चुकीचा असल्याचे लोकप्रतिनिधी यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी नातेपुते नगरपंचायत येथे लोकप्रतिनिधी यांनी विशेष सभा घेऊन सदर आराखडा संबंधित विषय घेऊन सभागृहासमोर ठेवला व सभागृहाने बहुमताने सदर विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव मंजूर करून सदर विकास आराखडा रद्द करण्यात यावा असे लोकप्रतिनिधी यांनी बहुमताने सांगितले.

 

Reactions

Post a Comment

0 Comments