सेवा मंडळ संचलित राजर्षी शाहू संकुलात 76 वा प्रजासत्ताक दिनात स्काऊट गाईड पथक संचलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा समाज सेवा मंडळ संचलित, राजर्षी शाहू शिक्षण संकुल, विडी घरकुल येथे 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मनोहरपंत सपाटे हे अध्यक्ष म्हणून व प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शालेय समिती चेअरमन महेश माने, प्राथमिक विभागाचे महादेव गवळी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उदयसिहं पवार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. महानंदा सोलापुरे, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.विजयालक्ष्मी त्यारला हे सर्व मान्यवार कार्यक्रमास उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर कोमीनारे व स्काऊट गाईड पथक संचलन करण्यात आले. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चिमुकल्यांची भाषणे, देशभक्तीपर नृत्य, राष्ट्रीय एकात्मता नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शुभांगी नांदुरकर यांनी केले तर समारोप विलास माळी यांनी केले. कार्यक्रमास संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांगता अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
0 Comments