शिव विचारांचा प्रचार व प्रसार ही काळाची गरज- प्रा. मिनाक्षी जगदाळे
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघ प्रणित, जिजाऊ ब्रिगेड च्या माध्यमातून,प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके यांच्या मार्गदर्शना प्रमाणे आज पहिल्या रविवारी शिव विचार सर्वांमध्ये रुजवण्यासाठी व जिजाऊंचे विचार घराघरांमध्ये पोहचण्यासाठी शिवविचार बैठक अकलूज ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे प्रा मीनाक्षी अमोल जगदाळे विभागीय अध्यक्ष- विभाग पुणे यांनी आयोजित केली होती.
जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली .आज संतश्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांची जयंती
अभंग व वाचनानेसाजरी करण्यात आली .शिवमती प्राध्यापक मीनाक्षी अमोल जगदाळे विभागीय अध्यक्ष यांनी महिलांना मार्गदर्शन केले .यावेळी युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब लिखित शिवचरित्राचे वाचन मीनाक्षी जगदाळे यांनी केले,
शिवचरित्र, जिजाऊंची शिकवण, शिवबांचा जन्म व शिवबांचे बालपण हे विषय घेऊन सौ जगदाळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.सर्व महिला बौद्धिक, मानसिक, शैक्षणिक, वैचारिक, साहित्यिक सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात त्यासाठी हा नवीन उपक्रम घेतल्याचे सौ जगदाळे म्हणाल्या.हा विचार महिलांना खूप आवडला.
महिलांनी कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, त्यांना हा उपक्रम खूप आवडला.आणि या गोष्टींची काळाची गरज असल्याचे महिलांनी सांगितले. खूप छान प्रतिक्रिया मिळाल्या.
त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या रविवारी शिव विचार चे वाचन होईल तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील आपल्याला मार्गदर्शन करतील याचे मी नियोजन करून तुम्हाला वैचारिक मेजवानी दर महिन्याला देणार असल्याचे शिवमती मीनाक्षी जगदाळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील व सर्व जाती धर्मातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
0 Comments