तांबवे विकास सोसायटी वर राजाभाऊ खटके पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):-तांबवे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक 2025-30 बिनविरोध पार पडली मंगळवार दिनांक.21.01.2025 रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजाभाऊ खटके पाटील गटाचे सर्व साधारण जागेसाठी आठ, महिला राखीव दोन, इतर मागासवर्गीय एक असे एकूण एकरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी बुधवार दिनांक.22.01.2025 रोजी सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठवरविले. तांबवे विकास सोसायटीच्या निवडणुकीसाठी राजाभाऊ खटके पाटील यांच्या गटाच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्यामुळे निवडणुक बिनविरोध पार पडली. पार्टीचे प्रमुख राजाभाऊ खटके पाटील यांच्या नेतृत्वाखाली तांबवे विकास सोसायटीच्या नूतन संचालक पदी भजनदास वामन खटके, अशोक भागवत खटके, सुधाकर हंबीरराव खटके, नवनाथ भगवान खटके, अर्जुन हंबीरराव खटके, रेवनाथ मुकंद खटके, सुभाष भगवान खटके, विठल प्रल्हाद खटके, सुमन देवराव खटके, रुपाली सुहास देशमुख, पैगंबर इस्माईल तांबोळी यांची बिनविरोध निवड झाली. तांबवे विकास सोसायटीच्या मागील तीन निवडणूका बिनविरोध झाल्या असून मागील तिन्ही निवडणूकामध्ये राजाभाऊ खटके पाटील यांच्या नेतृत्वाखालील पार्टीचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. तांबवे विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पार्टीचे मार्गदर्शक श्री.अरविंद खटके, माजी सरपंच उद्धव खटके, मुकंद खटके, जेष्ठ नेते पैलवान चंद्रकांत खटके, माजी सरपंच भारत खटके, माजी उपसरपंच मधुकर खटके, माजी सरपंच शिवाजी खटके, माजी सरपंच रमेश गोडसे, माजी संचालक भालचंद्र खटके, बागायतदार शरद खटके, विद्यमान सरपंच सचिन कांबळे, भाजप चे माजी तालुकाध्यक्ष विनायक भगत, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ.धनश्री खटके, पैलवान विकास बापू खटके, मनसेचे तालुका प्रमुख सुभाष बापू खटके, दीपक खटके, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रणजित देशमुख, ब्रह्मदेव खटके, बागायतदार घनशाम खटके, हे बिनविरोध निवडणुकीचे शिल्पकार ठरले आहेत. तांबवे विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल राजाभाऊ खटके पाटील यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार बबनराव शिंदे, नेते प्रा.शिवाजीराव सावंत, आमदार अभिजित पाटील, तालुक्याचे नेते संजय बाबा कोकाटे, दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, माजी जि.प.सभापती भारत आबा शिंदे, माजी जि.प.सभापती शिवाजीराजे कांबळे, माजी जि.प.सभापती संजय पाटील भीमानगरकर, अतुल भाऊ खुपसे, युवा नेते पृथ्वीराज सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजप माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, टेंभुर्णीचे सरपंच सौ.सुरजा बोबडे, रावसाहेब देशमुख, सुरज देशमुख, लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन भारत नाना पाटील, गणेश पाणी पुरवठा सह.चे चेअरमन तथा कन्हेरगावचे सरपंच लिंबाजी मोरे, सापटणेचे नेते बाळासाहेब ढवळे पाटील, सरपंच दत्तात्रय ढवळे पाटील, सुधीर महाडिक देशमुख, भाऊसाहेब महाडिक देशमुख,शेती अधिकारी तानाजी कदम, पालवानचे तंटामुक्त अध्यक्ष भारत साळुंखे, शिराळचे सरपंच बाळासाहेब ढेकणे, अमर मुळे यांनी अभिनंदन केले.
0 Comments