Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते एस.एन.डी इंटरनॅशनल स्कूलचे रेखा कला परीक्षेत यश

 नातेपुते एस.एन.डी इंटरनॅशनल स्कूलचे रेखा कला परीक्षेत यश

नातेपुते  (कटूसत्य वृत्त):-कला संचनालय मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत नातेपुते येथील एस.एन.डी इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलच्या २४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदर परीक्षा नातेपुते येथील डॉक्टर बा.ज. दाते प्रशाला येथे घेण्यात आल्या होत्या. सदर घेण्यात आलेल्या एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल लागला असून यामध्ये एस. एन. डी.इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यामध्ये खुशी साळुंखे या विद्यार्थिनींनी ए ग्रेड मिळविला असून अमृता ढोपे, ऐश्वर्या लोंढे, शिवांजली कदम, सोनाक्षी शिंदे, पायल निटवे, आर्यन साळुंखे, मृणाल मोरे या आठ विद्यार्थ्यांनी बी ग्रेड मिळवली तसेच 15 विद्यार्थ्यांनी सी ग्रेट मिळवली या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक रवींद्र वेटपाथक यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख संस्थेचे चेअरमन मालोजीराजे देशमुख मुख्याध्यापक संदीप पानसरे स्कूल मॅनेजर शकूर पटेल संस्थेचे पीआरओ मनोज राऊत व संस्थेचे संचालक मंडळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
Reactions

Post a Comment

0 Comments