आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन" मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 31, 2025

आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन" मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

 आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन"

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

जालना (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण आता स्थगित करण्यात आलं आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी त्यांना ज्युस दिला आणि त्यांचं उपोषण सोडवलं.

सुरेश धस यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण स्थगित
सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंतरवाली सराटीत आलेल्या आमदार सुरेश धस यांच्याहस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. मात्र, याचवेळी सरकारने आमच्या मागण्यांसदर्भात लवकरच निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन राजधानी मुंबईत करणार असून त्याचीही घोषणा केली जाईल, असा इशाराच सरकारला दिला आहे. आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे आणि प्रकाश सोळंकी यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. यावेळी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेही उपस्थित होते.

मनोज जरांगेंनी काय म्हटलं?
“काही लोक म्हणत आहेत की मनोज जरागेंच्या उपोषणातून काय मिळाल? पण त्यांचा २४ तास एकच धंदा आहे, त्यांना काही करायचं नाही. राज्य सरकारकडून शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती. शिंदे समितीच्या मंत्रालयावरील ऑफिसला कुलूप लावण्यात आलं होतं, जे काय मिळालं म्हणत होते ना? घरात बसून नेत्यांचे पाय चाटणाऱ्यांना काय मिळालं ते कळणार नाही, असा टोला काही मराठा समन्वयकांना जरांगे पाटील यांनी लगावला. आता शिंदे समिती राज्यात काम करणार आहे, पूर्ण राज्य आमचं आहे. पण, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात काही अधिकारी जातीयवादी आहेत, ते मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्र देत नाहीत, त्यांना बडतर्फ केलेलंच बरं असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

सगे-सोयऱ्यांची अमलबजावणी न केल्यास मुंबईत आंदोलन
सग्या सोयऱ्यांची अमलबजावणी आम्हाला पाहिजेच आहे. ती झाली नाही तर आता लवकरच मुंबईतल्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याचंही मनोज जरांगे म्हणाले. मुंबईत जर आंदोलन सुरु केलं तर तिथून काही माघार घेणार नाही.आपल्याला मुंबईला पोलिसांनी मारलं तरीही पोलिसांना बोट लावायचं नाही. पण, मंत्र्यांना आणि त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं असा इशाराच मनोज जरांगेंनी दिला. तसेच, आता हे आंदोलन स्थगित करत आहे, या जागेवर सभामंडप करायचा आहे. यापुढे शक्यतो आता उपोषण करायचं नाही, समोरासमोर लढायचं आहे. लवकर अमलबजावणी न झाल्यास मुंबईची तारीख जाहीर करेन, तेव्हा मुंबई जाम होऊ शकते, यावेळी मराठे मागे येऊ शकत नाहीत, असंही मनोज जरांगे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages