करमाळा तालुका जिल्ह्यातील सर्वाधिक दुग्ध उत्पादन करणारा तालुका व्हावा- आ.सुभाष देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 13, 2025

करमाळा तालुका जिल्ह्यातील सर्वाधिक दुग्ध उत्पादन करणारा तालुका व्हावा- आ.सुभाष देशमुख

 करमाळा तालुका जिल्ह्यातील सर्वाधिक दुग्ध उत्पादन करणारा तालुका व्हावा- आ.सुभाष देशमुख




करमाळा (कटूसत्य वृत्त):- लोकमंगल को.ऑप बँक लि.,सोलापूर व दूध डेअरी चेअरमन असोसिएशन करमाळा व छत्रपती दूध संकलन व शीतकरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेहसंवाद मेळावा संपन्न.
 याप्रसंगी लोकमंगल बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष  देशमुख यांनी मेळाव्यास उपस्थित सर्व दूध संकलन (चेअरमन) संस्थाचालकांसमवेत  संवाद साधत दुग्ध व्यावसायिकांना व्यवसाय वाढीबाबत मार्गदर्शन केले.तसेच दूध उत्पादन वाढीसाठी  बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देऊन आर्थिक सक्षम करण्याची ग्वाही दिली.प्रातिनिधिक स्वरुपात दूध संकलन केंद्र चालकांना बँकेच्या वतीने अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत मंजूर झालेल्या कर्जाचा चेक वितरण करण्यात आले. करमाळा तालुका जिल्ह्यातील सर्वाधिक दुग्ध उत्पादन करणारा तालुका व्हावा याकरिता सर्वांनी एकजूट होऊन प्रयत्न करावेत,दुधापासून प्रक्रिया करून विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करावेत, लोकमंगल बँकेच्या विविध महामंडळाच्या (व्याज परतावा ) योजनांचे तसेच फूड प्रोसेसिंग योजनेचा लाभ देऊन  तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील सर्वपरी मदत करण्यास मी तयार आहे असे मत व्यक्त केले. तसेच दूध संस्था चालकांनी पशुखाद्य निर्मिती करून शेणखत तयार करून, गोमूत्र वर प्रक्रिया करून त्याची विक्री करून आपल्याकडील विविध दूध उत्पादक यांचे दुधाचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना मदत करून त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक अजिंक्य पाटील व शिवाजी पाटील ( छत्रपती दूध संकलन केंद्र), दिपक देशमुख (लोक विकास डेअरी चेअरमन), महेश चिवटे (शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख), दत्तात्रय आडसुळ (मा.उपसभापतीमार्केट कमिटी करमाळा), लोकमंगल बँकेचे व पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी तसेच तसेच करमाळा तालुक्यातील दुग्ध संकलन केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages