विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी पालकांनी सुसंवाद ठेवण्याची गरज - प्राचार्य चंद्रकांत ढोले
अनगर प्रशालेत पालक शिक्षक सभा संपन्न
अनगर (कटूसत्य वृत्त):- दहावी व बारावीची परीक्षा तोंडावर आल्याने अभ्यासाचा विद्यार्थ्यांच्या मनावर वाढता ताण आल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत.यातून बाहेर पडण्यासाठी मुले मोबाइलला जवळ करतात पण त्यामुळे ही समस्या आनखी जटील होते. यातून त्याला सावरण्यासाठी पालकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पालकांनी विद्यार्थ्याशी उत्तम सुसंवाद ठेवावा त्यांना समजून घ्यावे मुले नक्कीच यशस्वी होतील असे मत अनगर ज्यु काॅलेजचे प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी परीक्षा पे चर्चा करताना पालक सभेत मांडले.
यावेळी उपप्राचार्य महादेव चोपडे यांनी क्रीडा समिती, योग प्राणायाम शिबिर स्पर्धा परीक्षा,अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिन, घर घर संविधान या विषयी माहिती दिली
माधवी पाचपुंड यांनी सखी सावित्री समिती,माता पालक समितीची माहिती देताना पालकांना अंतर्मुख केले. उज्वला घोलप यांनी मुलींची सुरक्षा या विषयावर माहिती
डॉ. प्रशांत कुलकर्णी यांनी करिअर मार्गदर्शन तर राजेंद्र डोके यांनी अभ्यासपूर्वक उपक्रमाची माहिती दिली. अमोल खताळ यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी याविषयी माहिती दिली.रमेश चव्हाण यांनी परिवहन विभाग तर गोरख गायकवाड यांनी पालकांची कर्तव्ये व जबाबदारी याविषयी सविस्तर माहिती दिली
पालकसभेसाठी संचालक लहू निरगिडे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ. वैभव काळे डॉ.सुवर्णा गुजरे,डाॅ अंजली काळे, केंद्रप्रमुख महादेव माने आदी शिक्षक,पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान दाढे यांनी केले तर आभार सोमनाथ ढोले यांनी मांडले
0 Comments