Hot Posts

6/recent/ticker-posts

ध्वजदिन निधी -२०२४ संकलनात सर्वांनी योगदान द्यावे

ध्वजदिन निधी -२०२४ संकलनात सर्वांनी योगदान द्यावे





-        उपजिल्हाधिकारी नाटेकर


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- देशाच्या संरक्षणासाठी जवान प्रतिकुल अशा परिस्थितीमध्ये सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना शहीद होतात. अशा शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावेत्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वजदिन निधीचा विनियोग केला जात असल्याने संकलनात सर्वांनी योगदान करावेअसे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) अमृत नाटेकर यांनी केले.

                सशस्त्र सेना ध्वजदिन निधी -२०२४ संकलन शुभारंभ व ध्वजदिन -२०२३ चे उत्कृष्ट निधी संकलन

केलेल्या कार्यालय प्रमुखांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम बहुउद्देशीय सभागृहजिल्हाधिकारी कार्यालय,

सोलापूर येथे संपन्न झाला.  यावेळी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि)जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीसोलापूरकमांडर अशोक कुमार (नि)मा.श्री. कादर शेखशिक्षणाधिकारी प्राथमिकअविनाश घाटगे,राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकअरुणकुमार तळीखेडेमाजी सैनिक संघटना अध्यक्षसोलापूरजिल्हयातील विविध शासकीयनिमशासकीय कार्यालयाचे प्रमुखविविध संस्था व शाळामहाविदयालयाचे ३८ बटालियन चे एन.सी.सी कॅडेटवीरमातावीरपितावीरनारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

                उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यावेळी म्हणालेमाजी सैनिकशहीद जवान यांचे प्रतिनिधी यांनी मागणी केल्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडील विषय मार्गी लावण्यात येतील.  तसेच शासनाने सोलापूर जिल्ह्यास सन 2024 साठी ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

                प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले व शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

                मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि)जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीसोलापूर यांनी ध्वजदिनाचे महत्व तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनाविषयी उपस्थितांना माहिती दिली.                            शासनाने सोलापूर जिल्ह्यास सन 2023 या वर्षीसाठी रु. ०१ कोटी ५४ लाख ४१ हजार फक्त सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट दिले होते.    जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ठ रु १,५९,२०,११५/- म्हणजेच १०३.१०% उद्दिष्टपुर्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

                कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुलदीप कमळे सहा.शिक्षक,  सिध्देश्वर इंग्लिश मेडीयम हायस्कूलसोलापूर यांनी केले.  

                कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. तसेच या कार्यक्रमास श्री सिध्देश्वर इंग्लिश मेडियम हायस्कूलसोलापूर येथील विदयार्थ्यांनी व शिक्षीकांनी देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम करुन कार्यक्रमाची शोभा वाढविली. सर्वात शेवटी सृती कुलकर्णीसहा.शिक्षक श्री सिध्देश्वर इंग्लिश मेडीयम हायस्कूलसोलापूर यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. 

Reactions

Post a Comment

0 Comments