खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी उद्योजक व्यावसायिकांना मार्गदर्शन केले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 9, 2024

खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी उद्योजक व्यावसायिकांना मार्गदर्शन केले

 खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी उद्योजक व्यावसायिकांना मार्गदर्शन केले




अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी, माढा लोकसभा मतदारसंघ व सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि नवोदित उद्योजकांसाठी गुजरात गांधीनगर येथे शिवरत्न शिक्षण संस्था ,शिवामृत दूध संघ यांच्या सहकार्याने एक विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे.नवउद्योजक विकास कार्यक्रमाचा समारंभ संपन्न होऊन, अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उद्योजक व्यावसायिकांच्या करीता,शिवरत्न नाॅलेज सिटी अकलूज येथे परीक्षा संपन्न झाली. या वेळेस खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थितीत होती.यावेळी त्यांनी उद्योजक व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचा उद्देश नवीन उद्योजक निर्माण करणे आणि सध्याचे उद्योजक अधिक सक्षम करणे हा आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देणे, बँकांकडून कर्ज मिळवून देण्यात मदत करणे आणि विविध उद्योग संस्थांशी करार करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील,बँक ऑफ बडोदाचे मुख्य व्यवस्थापक मनिषकुमार सिन्हा,अशांक चांदणे,जितेंद्र बाजारे, शिवामृतचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय भिलारे, शिवरत्न शिक्षण संस्थचे सचिव धर्मराज दगडे,संचालक डाॅ विश्वनाथ आवड,प्रशांत जगताप,श्रीकांत राऊत, नितीन बनकर,काटकर सर,प्रशासन अधिकारी अश्रफ शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages