डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने महापरिनिर्वाणदिनी अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 9, 2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने महापरिनिर्वाणदिनी अभिवादन

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने महापरिनिर्वाणदिनी अभिवादन



 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  सकल मातंग समाज व क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष  सुरेश पाटोळे, प्रविण वाडे, कोमल माचले, गौतम बनसोडे, राजाभाऊ जाधव, योगेश सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
      यावेळी सुरेश पाटोळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चातुवर्णीय व्यवस्थेतील तळाच्या वर्णातील कोट्यावधी अस्पृश्य लोकांना आणि त्यांच्या येणाऱ्या भावी पिढ्यांना स्वाभिमानाचे जीवन बहाल केले.महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिक काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, पर्वती मंदिर सत्याग्रह, अमरावतीच्या अंबाबाई मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन यासारखे लोकलढे बाबासाहेबांनी अस्पृश्यांना माणूसपण मिळवण्यासाठी उभारले.  बाबासाहेबांनी शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा! हा नारा दिला. आता मागासलेला समाज शिक्षित होऊन   बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ आणि भावनिकरित्या समतोलपणे विचार करू लागला आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'सामाजिक न्यायासाठी' अनुसूचित जाती जमातीना भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली. या समाजासाठी  आरक्षण हा विकास, प्रगती आणि उन्नतीचा मार्ग बनला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages