माकपच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारताला लोकशाही चे आयुध देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतातील वर्ग , वर्ण , जातीय उतरंड चातुर्वर्ण्य व्यवस्था नष्ट करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय प्रबोधन केले. सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक, मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी संविधानाची निर्मिती केली.या देशातील प्रतिगामी ,मूलतत्ववादी शक्तीमुळे संविधान धोक्यात आल्याची टीका ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी केली. राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे असे ही ते म्हणाले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पार्क चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तदनंतर दत्तनगर येथील पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तदपूर्वी जिल्हा सचिव ॲड एम एच शेख म्हणाले की, राज शिष्टाचाराची पायमल्ली करून नुकताच शपथ विधी सोहळा पार पडला.यावरून यांचा मनमानी धोका ओळखला पाहिजे.असे मत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर पक्षाचे जिल्हा सचिव ॲड एम एच शेख,युसुफ शेख मेजर, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, शेवंता देशमुख,रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे, कुरमय्या म्हेत्रे,सलीम मुल्ला, दीपक निकंबे, दाउद शेख, बापू साबळे,विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी, शकुंतला पानिभाते,पुष्पा पाटील,दत्ता चव्हाण, बाबू कोकने, ॲड नासीर मशाळवाले अकील शेख,इलियास सिद्दीकी, वीरेंद्र पद्मा, बजरंग गायकवाड, विजय हर्सुरे,बाळकृष्ण मल्याळ, अभिजीत निकंबे,अशोक बल्ला,शाम आडम, मल्ले शाम कारमपुरी, अफसाना बेग आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड अनिल वासम यांनी केले.
0 Comments