सोलापूर शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- आ. देवेंद्र कोठे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे एक प्रकारचा शाप आहे. ही स्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 892 कोटींची योजना मंजूर केली आहे. ही योजना पूर्ण करून शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे अभिवचन शहर मध्यचे लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी सोमवारी दिले.सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजप उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजप शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, यंत्रमाग उद्योजक भूपती कमटम, पेंटप्पा गड्डम, अंबादास बोल्ली, माजी उपमहापौर प्रविण डोंगरे,राजमहेंद्र कमटम,अशोक काळजे, व्यंकटेश बिटला, भाजपचे उमेदवार सुनिता कामाठी, अंबिका चौगुले, विजय चिप्पा, सत्यनारायण गुर्रम, निवडणूक प्रमुख विजयाताई वड्डेपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आमदार देवेंद्रदादा कोठे पुढे म्हणाले की, प्रभाग क्रमांक 13 हा भाजपचा बालेकिल्ला तसेच शहर मध्यचा केंद्रबिंदू आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी या प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे माझ्यासह शहराध्यक्ष तसेच प्रदेशापुढे मोठा पेच पडला होता. 40 इच्छुकांपैकी केवळ चार जणांना पक्षाने संधी दिली. मात्र याचा अर्थ 36 परके आहेत, असा होत नाही. पक्ष संधी दिली नाही तरी या प्रभागातील जुने तसेच सर्व सहकारी तळमळीने काम करीत आहेत. त्यांना मी एकच सांगू इच्छितो भाजप ही कार्यकर्त्यांची, त्यागाची व न्यायाची पार्टी आहे. उमेदवारी दिली नसतानाही कार्यकर्ते घरात बसले नाहीत, पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून ते या निवडणुकीत परिश्रम घेत आहेत, याचा मला अभिमान आहे. काळाचा महिमा एवढा अगाध आहे की, सन 2017 मध्ये ज्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली अशा रोहिणी तडवळकर आज शहराध्यक्षपदी काम करीत कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. हे लक्षात घेता कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे. त्यांच्या कार्याची दखल निश्चितपणे होऊन त्यांना न्याय देऊ, असे आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले.
सोलापूर शहरात पाणी हा कळीचा मुद्दा आहे. तीन ते पाच दिवसाआड सोलापूरला पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा दिवस हा शाप आहे. हे चित्र बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 892 कोटींची योजना मंजूर केली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यावर शहराला दररोज व समान पाणीपुरवठा करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर तसेच भाजपवर विश्वास ठेवून मी काम करीत आहे. येथील शिकलेली तरुण पिढी रोजगारअभावी बाहेरगावी जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सोलापूरसाठी आयटी पार्क मंजूर केले आहे. आयटी पार्कसाठी विमानसेवा आवश्यक होती. त्याचीही पूर्तता झाली आहे. गोवा, मुंबईनंतर आता बंगलोर, तिरुपतीला विमानसेवा सुरू होणार आहे. खासदार प्रणिती शिंदे या वारंवार विमानसेवा बाबत आव्हान देत होत्या. पण कामाची गॅरंटी म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, हे सिद्ध झाले. आयटी पार्क झाल्यावर सोलापुरातील तरुणाईला सोलापुरातच रोजगार मिळून आई-वडिलांसमवेत राहण्याचे पुण्य मिळणार आहे. या विविध गोष्टी होण्यासाठी महापालिकेत भाजपची सत्ता येणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी झटून भाजपच्या चारही उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन शेवटी आमदार देवेंद्र कोठे यांनी केले.
कार्यक्रमास अनिल कामाठी,मनोहर विडप,दिलीप शिंदे, अंबादास बोल्ली, पांडुरंग मुदगल, लक्ष्मण विटकर,सुरेश तमशेट्टी, मधुकर वडनाल,भीमाशंकर बोळकोटे, दत्तात्रय कल्पवृक्ष,मच्छिंद्र जाधव,मारुती विटकर,जगू काळे,विकास पवार,महादेव घोडक,वंदना भिसे, मल्लिकार्जुन सरगम,सदानंद गुंडेटी,यादगिरी बोम्मा,गंगाधर गुल्लापल्ली, व्यंकटेश क्यातम,शंकर चौगुले,अमर चिप्पा, अनिल चिप्पा,प्रशांत पासकंटी,गोपीकृष्ण वड्डेपल्ली,महेश अलकुंटे,आदी उपस्थित होते.
0 Comments