Hot Posts

6/recent/ticker-posts

दिनेश घोडके यांच्या भाजपाला पाठिंब्यामुळे चार प्रभागांमध्ये वाढले बळ

 दिनेश घोडके यांच्या भाजपाला पाठिंब्यामुळे चार प्रभागांमध्ये वाढले बळ

जय मातादी प्रतिष्ठानसह दिनेश घोडके मित्र परिवार भाजप उमेदवारांच्या झाले प्रचारात सक्रिय

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जय मातादी प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन उभे करणारे दिनेश घोडके यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे निवडणुकीतून माघार घेत भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू केल्याने भारतीय जनता पार्टीच्या चार प्रभागातील उमेदवारांना मोठे बळ मिळाले आहे. प्रभाग क्रमांक १३ सह प्रभाग क्रमांक ९, १२ आणि १८ अशा चारही प्रभागांमध्ये भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे.


दिनेश घोडके यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जय मातादी प्रतिष्ठान तर्फे विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विणले आहे. दिनेश घोडके यांना प्रभाग क्रमांक १३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी जय मातादी प्रतिष्ठानचे प्रमुख दिनेश घोडके यांना विश्वासात घेऊन आगामी काळात सकारात्मक विचार करण्याची हमी दिली. आणि उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केली. आमदार देवेंद्र कोठे यांनी दिलेला शब्द प्रमाण मानून दिनेश घोडके यांनी या निवडणुकीतून माघार घेत भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक १३ मधील सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला तसेच त्यांच्या समवेत प्रचारात सक्रिय झाले आहेत. 


प्रभाग क्रमांक १३ सह परिसरातील प्रभाग क्रमांक ९, १२ आणि १८ अशा चारही प्रभागांमध्ये दिनेश घोडके यांचा कार्यकर्ता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना दिनेश घोडके यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिल्यामुळे जय मातादी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच दिनेश घोडके मित्रपरिवार भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. श्री. घोडके यांच्या या भूमिकेमुळे भाजपने निवडणुकीच्या स्पर्धेत विरोधकांना मागे खेचत एक पाऊल पुढे टाकले आहे.


आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात बारकाईने लक्ष घालत भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघ शतप्रतिशत भाजपमय करण्याचा चंग बांधलेला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत असून उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रारंभी काहीसे नाराज झालेले भाजपाचे कार्यकर्ते आता मात्र प्रचारात जोरदार सक्रिय झालेले दिसून येत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments