सोलापूरच्या उच्च शिक्षणात एमआयटीला नवी क्रांती शक्य - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 16, 2024

सोलापूरच्या उच्च शिक्षणात एमआयटीला नवी क्रांती शक्य

 सोलापूरच्या उच्च शिक्षणात एमआयटीला नवी क्रांती शक्य



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केगाव येथील एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ जागतिक पातळीवरील विद्यापीठांच्या सहकार्याने सोलापूर परिसरातील उच्च शिक्षणात नवी क्रांती निश्चितच घडवू शकते, असा विश्वास डेन्मार्क येथील आलवॉर्ग विद्यापीठातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केला.डेन्मार्क येथील आलवॉर्ग विद्यापीठातील तज्ज्ञ मंडळींनी एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाला भेट देऊन जागतिक पातळीवरील शिक्षणाशी संबंधित विपयावर चर्चा केली. या चर्चे दरम्यान, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचा ग्रीनफील्ड विद्यापीठ म्हणून उल्लेख करून गौरव करण्यात आला. आलवॉर्ग विद्यापीठातील युनेस्को सेंटर फॉर प्रॉब्लेम वेस्ड लर्निंगच्या संचालिका प्रा. झियांग्युनडू, प्रा. युआन लिंडसे आणि डॉ.हेनरिक वॉर्म राऊथे यांचा या तज्ज्ञ मंडळीत समावेश होता. एमआयटी विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षाप्रा. स्वाती कराड आणि कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी यांनी विश्वप्रयाग आलवॉर्ग विद्यापीठाला दिलेल्या भेटीनंतर तेथील तज्ज्ञ मंडळींनी एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात येऊन शैक्षणिक वावींवर सखोल चर्चा केली.या भेटीचा एक भाग म्हणून, पहिल्या दिवशी विद्यापीठातील शिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत उच्च शिक्षणाशी संबंधित जागतिक स्तरावरील सर्वोत्तम उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यात उच्च शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, विद्यार्थ्यांच्या चांगल्या शिकण्यासाठी मूल्यमापन प्रक्रिया आणि प्रॉब्लेम - वेस्ड लर्निंगदृष्टिकोनाद्वारे वहुविपयक शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विपयांचा समावेश होता. या कार्यशाळेत संगणकशास्त्र,डिझाईन व्यवस्थापनशास्त्र, आणि फार्मसी अशा विविध विभागांच्या शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच, आलवॉर्ग विद्यापीठाच्या पथकाने कुलगुरू प्रा.गोपाळकृष्ण जोशी यांच्या नेतृत्वाखालील विद्यापीठाच्या नेतृत्व मंडळासोवत विविध क्षेत्रांत अर्थपूर्ण सहकार्याची शक्यता शोधण्यासाठी चर्चा केली.संपूर्ण भेटीदरम्यान दोन्ही विद्यापीठांच्या तज्ज्ञांनी शैक्षणिक धोरणे, संशोधन संधी आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले. यामुळे एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यांच्या प्रवासाला अधिक उंची मिळणार असल्याचा विश्वास एमआयटीच्या  संचालकांनी  व्यक्त केला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages