मोहोळच्या विकासात राजकारण येऊ देणार नाही- आ.राजाभाऊ खरे
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- ज्या अपेक्षेने मोहोळकरांनी परिवर्तनाच्या लढाईत मला मतदान केले व माझ्या विजयाची घोडदौड सुरू केली आहे.त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून कायम प्रयत्नशील असल्याचे सांगत मोहोळ शहरातील रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था,पिण्याचे पाणी, क्रीडांगण, रुग्णालयासारखे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी मी राजकीय जोडे वाजूला ठेऊन या शहराचा,तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे नूतन आ.राजाभाऊ खरे यांनी दिले.मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे यांची विजयी सभा मोहोळ येथील गवत्या मारुती चौकात पार पडली. यावेळी आ. खरे बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश वारसकर, मानाजी माने,पद्माकर देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, श्यामराव जवंजाळ, राहुल क्षीरसागर, संभाजी कोकाटे, ब्रह्मदेव भोसले, सतीश वारसकर, अॅड. विनोद कांवळे, सर्फराज सय्यद, राहुल तावस्कर, मंगेश पांढरे, आवा कांवळे आदी उपस्थित होते.यावेळी उमेश पाटील म्हणाले, मोहोळचे नूतन आमदार मतदारसंघाच्या विकासासाठी राज्य सरकारच्यावरोवर पूरक भूमिका घेऊन आपल्या व्यक्तिगत संबंधांचा उपयोग करून विकासकामे करणार आहेत. मोहोळची नगर परिषद आपल्या विचारांची राहिली पाहिजे तरच या शहराच्या विकासासाठी आमदार खरे यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने विकास निधी आणून कामे करता येतील. येणाऱ्या काळात या शहराचा सर्वागीण विकास, हेच आमचे धोरण आणि तोरण असल्याचेही उमेश पाटील यांनी सांगितले. रमेश बारसकर म्हणाले की, मोहोळ आणि तालुक्याचा विकास अडविण्याचे काम दोन्ही माजी आमदारांनी शहराचा केले आहे.मोहोळ तालुक्यात वसस्थानक, क्रीडासंकुल, एस. टी.उपजिल्हा रुग्णालय यासारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम नूतन आमदारांनी प्राधान्यक्रमाने करणे अपेक्षित आहे. धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतानाही मोहोळ
नगर परिषदेच्या प्रशासकांनी नागरिकांची मोठ्या प्रमाणात करवाढ केली आहे.त्याला स्थगिती आणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मगणीही यावेळी वारसकर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार अतुल क्षीरसागर यांनी मानले.
0 Comments