महाप्रसाद गृहाच्या बांधकामास जडेय शांतलिंगेश्वर यांची भेट
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या न्यासाकडून भक्ताभिमुख कार्य सुरु असून मंडळाच्यावतीने सुरू असलेल्या नूतन महाप्रसाद गृहाच्या बांधकाम स्थळास परम पूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी (निंबाळ मठ) यांनी भेट देऊन पाहणी केली. सध्या महाप्रसाद गृह इमारतीच्या बांधकामाचे काम सुरु झाले आहे. ही भव्य इमारत ५ मजली असून त्यावर ५१ फुटी श्री स्वामींची मूर्ती असणार आहे.ही इमारत वातानुकूलित असून,या इमारतीत एकावेळेस २ हजार भाविक महाप्रसाद घेतील व ५ हजार भाविक प्रतीक्षेत असतील इतक्या क्षमतेची आहे. ही इमारत श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी आहे. त्यामुळे गरज ओळखून मंडळाचे
संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी नूतन महाप्रसाद गृह उभारणीचा निर्णय म्हणजे दूरदृष्टी असल्यानेच न्यासाची प्रगती दिसत आहे. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा, असे लिखित आशीर्वचन महास्वामीजींनी दिले.
0 Comments