लालपरीस पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास शाषणाची परवानगी

तुळजापूर दि.१७(क.वृ.):- महाराष्ट्र शाषाणाने कर्नाटक व गुजरात राज्याचा धर्तीवर महामंडळाच्या बसेस ध्दारे पुर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतुक करण्यास महामंडळास मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्र शाषणाने 20/8/2020रोजी पन्नास टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूकिस परवानगी महामंडळास दिली होती माञ गुरुवार दि17रोजी आता पुर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी दिली आहे.
माञ बसेस निर्जतुंकिकरण करुणे बंधनकारक केले आहे. प्रवास करताना प्रवाशांनी स्वताहा मास्क व सँनिटायझर लावणे बंधनकारक आहे. यात आता लांब व मध्यम पल्याचा बसेस साठी पुर्णपणे आरक्षण उपलब्ध करुन दिले जाणार आहेत याची तात्काळ अमलबजावणी करण्याचे आदेश महाव्यवस्थापक राहुर गोरे यांनी दिले आहे.
0 Comments