तुळजापूरात कोरोनाचा कहर कायम

तुळजापूर दि.१८(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यात गुरुवार दि.17 रोजी 57 कोरोना बाधीत रुग्णा आढळले आहेत. यात शहरातील ऐकोणचाळीस रुग्ण आढळले आहेत तर तालुक्यातील ऐका 87 वर्षिय महिलेचा कोरोनाने मुत्यु झाला आहे.
सप्टेंबर महिन्यात कोरानाचा कहर सुरुच असुन गुरुवार वार दि.17 रोजी तुळजापूर तालुक्यात सत्तावन जण कोरोना पाँजिटीव्ह निघाले व ऐक महिला मरण पावली आहे. सत्तावन पैकी ऐकोणचाळीस जण तुळजापूर शहरातील असुन ऐक मयत ही तुळजापूर तालुक्यातील आहे.
यात सत्ताऐंशी वर्षिय महिला मयत झाल्यानंतर तिची कोरोना तपासणी केली असता तिचा अहवाल पाँजिटीव्ह आला. तुळजापूरात कोरोना पाँजिटीव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढतअसुन यास रोखण्यासाठी कडक उपाययोजना करणे काळाची गरज बनली अहे.
0 Comments