योगिराजेंद्र महास्वामीजींच्या मूर्तीची भक्तिभावाने मिरवणूक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-होटगी मठाचे तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्यमहास्वामीजी यांच्या सातव्या पुण्याराधनाचे औचित्य साधून होटगी मठाच्यावतीने तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मूर्तीची व कळसाची मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली.रविवारी सकाळी आठ वाजता बाळीवेस येथील होटगी मठात काशीपीठाचे जगदगुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते तसेच बृहन्मठाध्यक्ष चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली मूर्ती व कळसाची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी, जिंतूरचे अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजी, शहापूरचे सुरेश्वर शिवाचार्य स्वामीजी,कराडचे विजयलिंग स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित भाविकांनी श्री योगिराजेंद्र शिवाचार्य महाराज की जय च्या घोषणा दिल्या. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत श्री वीरतपस्वीजींची प्रतिमा, पालखी, हलगी, बॅन्ड, योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींची मूर्ती, कळस,संस्थेच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांचे ढोलपथक, लेझीमपथक, गाण्यावर नृत्य, घोडा, मठातील बटू व रथ यासह ही मिरवणूक बाळीवेस होटगी मठातून मधला मारुती,आजोबा गणपती, गुरुभेट,सात रस्ता, मजरेवाडी, साखर कारखाना मार्गे ही मिरवणूक होटगी मठात पोहोचल्यानंतर महामंगल आरती करण्यात आली.दुपारी चार वाजता शिवाचार्य महास्वामीजींच्या मंदिरास शिखराभिषेक करण्यात आला.मिरवणुकी या होटगी, बोरामणी, धोत्री,लिंबीचिंचोळी, अरळी,सातनदुधनी, बोरेगाव, कुंभारी,तांदुळवाडी, संगदरी, खानापूर,संरसंबा आदी गावातील भाविक पदयात्रेत भक्तिभावाने सहभागी झाले होते. सर्व योगिराजेंद्र आली.भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
0 Comments