गौडगाव मारुती मंदिरात दत्तजयंती साजरी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा'च्या गजरामध्ये गौडगाव येथील दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात दत्तजयंती भक्तिभवाने साजरी करण्यात आली.यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री दत्त मूर्तीची पूजा व आरती करण्यात आली. हजारो भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलून गेले होते. मारूतीचे दर्शन घेण्यासाठी गौडगाव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दत्तजयंतीच्या निमित्ताने मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मारूतीस महारूद्राभिषेक,नवग्रह पूजा, शनिपूजा, गजलक्ष्मी पूजा व होमहवन यज्ञ पार पडले.त्यानंतर दत्तात्रय मूर्तीस अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी भजन, कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.भाविकभक्तांना मंदिर समितीतर्फे हनुमान चालिसा देण्यात आली.दुपारच्या महाकाकड आरतीचा मान दुपारच्या महाकाकड आरतीचा मान कासेगावचे मारूती भक्त प्रभाकररामहरी पाठोले यांना मिळाला. श्री मारुतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकभक्तांना पुणे प्रवीणकुमार प्रकाश मेंथे व शत्रुघ्न गोवर्धन फावडे, शिशिर शत्रुघ्न गोवर्धन फावडे, शिशिर शत्रुघ्न फावडे यांच्याकडून श्री मारुती अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.येथील याप्रसंगी राज्य व परराज्यांतून आलेले हजारो भाविकभक्त या महाप्रसादाचा लाभ घेऊन तृप्त झाले. यावेळी श्रीकांत खानापुरे,सिद्राम वाघमोडे, प्रकाश मेंथे,ज्ञानेश्वर आमसिद्ध कोरे, फुलारी,चौडप्पा सोलापुरे, परमेश्वर सुतार, प्रकाश सनकळ, श्रीमंत सवळतोट, श्रीमंत म्हेत्रे, मल्लिनाथ मेत्रे, मल्लिनाथ पाटील, भारत ननवरे आदी उपस्थित होते.
0 Comments