अक्कलकोट ते वास्को बस सेवा सुरू
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- गोवा राज्यासह सिंधुदुर्ग- कोकण येथील स्वामी भक्तांच्या सेवार्थ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून पाठपुरावा केल्याने थेट वास्को ते अक्कलकोट ही गोवा राज्य परिवहन महामंडळ, (कदंबा) ट्रान्सपोर्टची बस सेवा सुरु झाल्याने स्वामिभक्तांतून समाधान व्यक्त होत आहे. या बसचे पूजन अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.बस पूजन प्रसंगी गोवा राज्य परिवहन महामंडळ, (कदंबा) ट्रान्सपोर्टचे सहाय्यक वाहतूक अधिकारी सुहेश सावंत, चालक मल्लिकार्जुन शिंदे, महेंद्र हजेरी, वाहक रफिक पटेल यांच्यासह न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, भारत पाटील आदी उपस्थित होते.वास्को वरून दररोज सायंकाळी ७ वाजता सुटणारी बस ही श्री क्षेत्र अक्कलकोटला
दुसऱ्यादिवशी सकाळी ७.३० वाजता आणि अक्कलकोटहून सायंकाळी ६.१५ वाजता सुटणारी बस ही वास्कोला दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता पोहोचणार आहे. ही बस पणजी, पत्रादेवी, बांधा, म्हापसा, कुडाळ, कणकवली, सांगली, मिरज, कोल्हापूर, पंढरपूर मार्गे सोलापूर,अक्कलकोटला पोहोचणार आहे.
0 Comments