आ. राजू खरे यांच्या हस्ते २ कोटी ७० लाखांच्या कामाचा प्रारंभ
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-मोहोळ विधानसभा मतदारसंघातून तयारी सुरू असतानाही, आ.राजाभाऊ खरे यांनी आपल्या भागाचा ही विकास झाला पाहिजे. ही भूमिका पार पाडण्यासाठी पंढरपूर मतदारसंघात येणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळविला होता. याच रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेची संरक्षक भिंत आणि परिसरात केवळ ब्लॉक टाकण्यासाठी २० लाख रुपये असा एकूण २ कोटी ७० लाख रुपये खर्चून होणाऱ्या कामाचा प्रारंभ मोहोळ मतदार संघाचे आ. राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.यामुळे गोपाळपूर भागातील शेतकऱ्यांसह, स्वेरी कॉलेजकडे जाणाऱ्या विद्यार्थी अन् या भागातील नागरिकांचा मोठा प्रश्न मिटणार आहे.आ. खरे हे गोपाळपूर येथील पंढरपूर : विकासकामाचे भूमिपूजन करताना आ. राजू खरे बनसोडे मळा याठिकाणी वास्तव्यास आले आहेत. त्यापूर्वी या भागातील रस्त्याची खुप दुरवस्था होती.पावसाळ्यात या भागातील शाळेत येणाऱ्या विद्यार्थी आणि शेतकरी याना गुडघाभर चिखलातून ये जा करावी लागत होती. हा रस्ता मुरमिकरण करण्यात आला होता. या भागातील रहदारी वाढत असल्याने आ. खरे यांच्या प्रयत्नातून पंढरपूर मंगळवेढा रस्त्यापासून संतोष बनसोडे ते खरे फार्म हाऊस आणि खरे फॉर्म हाऊस ते स्वेरी कॉलेज हा अडीच की. मी लांब आणि १२ फूट रुंद रस्ता होणार आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी साइडला ४ फुटाचे सिमेंट काँक्रिटचे साईड गटारही करण्यात येणार आहे. राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना ही कामे मंजूर करून घेण्यात आली होती. गोपाळपूर भागातील विकासांसाठी जवळपास ५ कोटी २० लाख रुपयाचा निधी आ. खरे यांच्या प्रयत्नाने मंजूर केला आहे. यापैकी ग्रामविकास विभागातून दीड कोटी रूपये खर्चातून ग्रामसचिवालय बांधण्यात येत आहे.या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात गोपाळपूर येथील अंतर्गत रस्त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५० लाख आणि ग्रामविकास विभागातून ५० लाख असा निधी मंजूर करुन घेतला आहे. या कामाचे शुभारंभ प्रसंगी सरपंच अरुण बनसोडे, सदस्य राजेंद्र बनसोडे संतोष बनसोडे, राहुल बनसोडे, तानाजी बनसोडे, अनिल बनसोडे, विजय खरे, समाधान बाबर, बंटी खरात यांच्यासह आ. खरे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments